Home » जळगाव » विहिरीत उडी घेवून जावयाने संपविले आयुष्य !

विहिरीत उडी घेवून जावयाने संपविले आयुष्य !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचोली येथील अपंग जावायाने विहिरीत उडी घेत दि. १४ जून रोजी आत्महत्या केली. सुरेंद्र रामराव बाविस्कर-पाटील (वय ४९) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते प्रिप्राळा येथील रहिवासी होते.

सुरेंद्र पाटील हे अपंग होते आणि चिंचोली येथील ते जावई म्हणून वास्तव्यास होते. त्यांनी गावातील चौकात असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संदीप सूर्यवंशी व पो.हे.कॉ. परदेशी पुढील तपास करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *