Home » जळगाव » जळगावात पोलिसांशी हुज्जत घालणे तरुणाना भोवले : अखेर गुन्हा दाखल !

जळगावात पोलिसांशी हुज्जत घालणे तरुणाना भोवले : अखेर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तरुणांची चौकशी केली. परंतू ते तरुण पोलिसांसोबत अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा प्रकार दि. १२ रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सफौ प्रणीत रणित, पोहेकॉ चंद्रकांत सोनवणे, आनंद राठोड, महेंद्र गायकवाड हे दि. १२ रोजी रात्रीच्या सुमारास गस्तीवर होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ते रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालीत असतांना त्यांना हर्षल दिलीप चौधरी व योगेश उर्फ पप्पू शर्मा (दोघ, रा. अयोध्या नगर) हे संशयास्पदरित्या फिरत होते. त्यांना चौकशीसाठी थांबवले असता ते पोलिसांसोबत ऐकरी भाषेत बोलू लागले.

तसेच चौकशीवेळी ते तुम्हाला काय गरज तुम्ही तुमची ड्युटी करा ना, आम्हाला टोकण्याचा विचारपूस करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे असे म्हणाले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्यांची समजवून सांगत होते, मात्र ते तरी देखील ऐकण्याच्या मनस्थिीत नसल्याने त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *