September 20, 2026 10:03 pm

Home » जळगाव » पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला शालकाकडून जबर चोप !

पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला शालकाकडून जबर चोप !

जळगाव : प्रतिनिधी

कौटुंबिक वाद झाल्याप्रकरणी तडजोड झाल्यानंतर पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या योगेश रामचंद्र सोनवणे (वय ३२, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) यांना शालकाने बेदम मारहाण केली. तसेच पत्रीसह शालकाच्या पत्नीनेही शिवीगाळ केल्याची घटना दि. १६ जून रोजी तालुक्यातील आसोदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल तालुक्यातील रिंगणकाव येथे राहणारे योगेश सोनवणे व त्यांची पत्री सपना सोनवणे यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असल्याने त्याविषयी महिला दक्षता समितीमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यामध्ये तडजोड झाली व योगेश हे आसोदा येथे पत्नीला घेण्यासाठी गेले. त्या वेळी शालकाची पत्ती भावना गोपाल बाविस्कर हिने ‘माझ्या नवऱ्याला उठविण्याच्या धमक्या देत असतात’, असे म्हणत वाद घातला व शिवीगाळ केली. त्या वेळी योगेशची पत्नी सपना हिनेही शिवीगाळ करीत मला नांदण्यासाठी यायचे नसून मुलीलादेखील देणार नाही, असे सांगितले. पत्नीने येण्यास नकार दिल्याने योगेश हे बसस्थानकाकडे जात असताना त्यांच्या पाठीमागे येत भावना व सपना या दोघींनी पुन्हा शिवीगाळ केली.

तसेच शालक गोपाल सुधाकर बाविस्कर याने बसस्थानक परिसरात शिवीगाळ करीत कॉलर पकडून जमिनीवर पाडले व मारहाण केली. या प्रकरणी योगेश सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून वरील तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नरेंद्र पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!