Home » राष्ट्रीय » जळगावात भरपावसात वखारीला लागली भीषण आग !

जळगावात भरपावसात वखारीला लागली भीषण आग !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका वखारीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. पावसाचे वातावरण असतांनाही आगीने प्रचंड रौद्र रूप धरण केले होते. त्यामुळे परिसारत भीतीचे वातावरण पसरले होते.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकाजवळ मटन मार्केटच्या समोर असलेल्या चंद्रिका सॉ मिलला (वखारीला) गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे नेमकी कारण समोर आलेले नसले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. सकळी अकरा वाजेच्या सुमारास लागलेली आग दुपार पर्यंत सुरू होती. मनपाच्या अग्निशमन दलाचे तीन बंब आग विझवण्याच्या कामी आले. सॉ मिलमध्ये असलेल्या कोरड्या लाकडांना ही आग लागल्याने काही क्षणातच संपूर्ण वखार त्या आगीच्या कचाट्यात सापडली. दरम्यान पाऊस सुरू असला तरी त्या लाकडांवर पत्र्याचे शेड असल्यामुळे त्या ठिकाणी आग आणखीच धगधगत होती. अखेर दुपारी मनपाच्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली.

आग लागताच परिसरातील नागरिक व काही तरुणांनी आग विझवण्यासाठी मदत कार्य सुरू केले. दरम्यान शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आग आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असल्याने त्यांना हटवण्याचे काम शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत होते. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका बाजूचा मार्ग रहदारीसाठी बंद केला असून ठिकाणी वाहतूक नियंत्रणात आणण्याचे काम देखील सुरू आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *