November 5, 2026 11:51 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » महाराष्ट्र » भाजप आमदारचे वादग्रस्त विधान : तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच !

भाजप आमदारचे वादग्रस्त विधान : तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच !

मुंबई : वृत्तसंस्था

महायुती सरकारमधील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सरकार आणि आपल्या विरोधात सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरुणांवर त्यांनी भाषणातून चांगलाच निशाणा साधला आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात. या कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन मीच दिले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले.

बबनराव लोणीकर म्हणाले, कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे. जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

मागील दोन दिवसांपूर्वीच भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना इशारा देणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जालना तालुक्यातील बोरगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी भाषणात विधानसभेत लीड नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत लोणीकरांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या. पाच वर्षांचे बलुतं, एक फुली द्या नाहीतर नका देऊ. पण तुम्ही मला नाही दिलं तरी पाच-दहा कोटी मिळतात हे डोक्यातून काढून टाका, असा टोला त्यांनी गावकऱ्यांना लगावला. तसेच, मी एक, दोन, तीन वेळा पाहिलं, त्यानंतर गावावर फुली मारील, असा थेट इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!