Home » जळगाव » २० वर्षीय तरुणाचा प्रताप : १५ वर्षीय मुलीला केले गर्भवती !

२० वर्षीय तरुणाचा प्रताप : १५ वर्षीय मुलीला केले गर्भवती !

जळगाव : प्रतिनिधी

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली. गेल्या एक वर्षापासून हा तरुण स्वतःच्या घरासह मुलीच्या घरी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत होता. या प्रकरणी निखिल लीलाधर कोळी (२०) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील १५ वर्षीय मुलगी शिक्षण घेत असून, तिच्याशी निखिल कोळी याने ओळख निर्माण केली. त्यानंतर, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तो तिच्या घरी येत राहिला. या दरम्यान, त्याने स्वतःच्या घरी आणि मुलीच्या घरी तिच्यावर अत्याचार केला. यातून ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. हा प्रकार समजल्यानंतर मुलीच्या आईने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *