जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा येथे समाधान हिरामण सुर्यवंशी (वय २६, रा. कुसुंबा, मूळ रा. आमोदा बुद्रुक, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघउकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारा समाधान सुर्यवंशी हे भावासह एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला आहे. सोमवारी दुपारी घरी कोणी नसताना समाधान याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांना घटना कळताच त्यांनी समाधान याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. समाधान याने आत्महत्या करण्यामागील कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई मोठा भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



