पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील मुंदाणे प्र.अ. येथे एका ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीवरील पाण्याचा पंप सुरु करताना जबर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची ही घटना गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन नारायण माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, शेतकरी अर्जुन माळी हे आपल्या मुंदाणे शिवारातील शेतात गायींना चारापाणी करण्यासाठी गेले होते. या वेळी गुरांसाठी पाण्याचे कुंड भरण्यासाठी ते विहिरीवरील पाण्याचा पंच सुरू करण्यासाठी गेले.

या वेळी त्यांना विजेचा जबर धक्का लागल्याने त्यांची शुद्धच हरपली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अर्जुन माळी यांना त्यांचे भाऊ नामदेव माळी यांनी खासगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत नामदेव माळी यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



