Home » जळगाव » विहिरीत पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

विहिरीत पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे कि, होळपिंप्री येथील घरातील कर्ता तरुण शेतकरी कल्पेश गोरख पाटील हे विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरल्याने विहिरीत पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे वडील गोरख पाटील यांनी बराच वेळ होऊन गेला तरी मुलगा परत आला नाही, हे बघण्यासाठी विहिरीजवळ गेले असता ही घटना उघडकीस आली. मात्र संध्याकाळ झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांना बोलवून रात्री मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या अंधारामुळे मृतदेह सापडू शकला नाही. रविवारी सकाळी पोहोण्यासाठी तरबेज असलेल्या व्यक्तींना बोलावून कल्पेश पाटील यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अजित पाटील यांनी पारोळा पोलिसांत खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *