भुसावळ : प्रतिनिधी
ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील टेक्निकल हायस्कूलसमोर घडला.

सविस्तर वृत्त असे कि, भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. मात्र, या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगावकडे जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम.पी. ६८ झेड डी ३५१४) दुचाकीला (क्रमांक एम. एच. १९ बीडब्ल्यू ३३३२) धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दीपक पंडित करोले (वय ३५, रा. राहुलनगर, पांडुरंग टॉकीजजवळ, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दीपक करोले याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



