Home » जळगाव » दहशत कमी करण्यासाठी खुनातील आरोपींची जळगावातील भररस्त्यात धिंड

दहशत कमी करण्यासाठी खुनातील आरोपींची जळगावातील भररस्त्यात धिंड

जळगाव : प्रतिनिधी

शहरात गाजलेल्या आकाश ऊर्फ टपऱ्या युवराज कोळी खून प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही मुख्य आरोपींची गुरुवारी १३ नोव्हेंबर रोजी, सायंकाळी ५:३० वाजता शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून धिंड काढण्यात आली. त्यांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस आणि आरसीपी पथकाने ही कारवाई केली. ९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता किरकोळ कारणावरून वादातून आकाश ऊर्फ टपऱ्या कोळी याचा खून झाला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. गुरुवारी त्यांची धिंड काढताना पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसुरी, योगेश ढिकले आणि शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. संशयितांना शनिपेठ पोलीस ठाणे येथून सुरू करून, घटनास्थळ, संशयित आरोपींचे घर परिसर, हरीओम नगर, वाल्मिक नगर, भिलपुरा चौक मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत फिरवण्यात आले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *