Home » जळगाव » जिल्ह्यात एसीबीची मोठी कारवाई : मुख्याध्यापकाने घेतली हजारांची लाच !

जिल्ह्यात एसीबीची मोठी कारवाई : मुख्याध्यापकाने घेतली हजारांची लाच !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालय लाच लुचपत विभागाच्या रडारवर असतांना आज जळगाव एसीबीने मोठी कारवाई करीत एका मुख्य्ध्यापकाला एक हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. तर एका शिक्षण विस्तार अधिकारी यांना देखील ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे असलेल्या प्राथमिक शाळेची इन्स्पेक्शन सुरू आहे. दरम्यान शाळेचे इन्फेक्शन करत असताना शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चांगला शेरा लिहावा म्हणून १० हजार रुपये मागितले आहेत, असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे वय-५५, रा. एरंडोल यांनी शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडून १ हजार रुपये असे एकूण १० हजार रुपयाची मागणी केली. दरम्यान यातील तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला या संदर्भात तक्रार केली. सोमवारी लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई करत शिक्षण विस्तार अधिकारी यांना पैसे देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून १ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी १ हजार रुपये हे देत असताना लाच लुचपत पथकाने कारवाई करत मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांना रंगेहात पकडले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी २ हजार रुपये मिळाल्याबाबत विरोध दर्शवला नाही आणि नंतर कॉल करतो असे सांगून फोन ठेवला. दरम्यान या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे वय-५५ रा. एरंडोल आणि एरंडोल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्यासह पथकाने केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *