Home » जळगाव » अमळनेर » ५२ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

५२ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील अंबारे येथील शेतकरी विलास आप्पा पाटील (वय ५२) याने स्वतःच्या राहत्या घरी छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.

मिळालेली माहितीनुसार,  विलास पाटील हे अमळनेर शहरात सुंदरनगर मध्ये राहतात. त्यांची मूळ गावी अंबारे येथे सहा बिघे शेती असून अंबारे येथील घरात शेती साहित्य ठेवतात. दि.२७ रोजी त्यांनी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातून फोनची रिंग वाजण्याचा आवाज येत होता मात्र फोन कोणी उचलत नाही हे पाहण्यासाठी गावातील कोणीतरी गेल्यावर दार उघडताच हा प्रकार निदर्शनास आला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. त्याच्यावर सेंट्रल बँकेचे दोन ते अडीच लाख कर्ज असल्याने कर्जबाजारातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *