भुसावळ : प्रतिनिधी
सिंधी कॉलनी परिसरात जुन्या वादातून तणाव वाढत एका तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला झाल्याची घटना दि. २७ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सागर राजकुमार कुकरेजा (वय २६) हे गंभीर जखमी झाले होते, त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सागर ककरेजा हे सिंधी कॉलनीतील बडी धर्मशाळेजवळून जात असताना संशयित आरोपी नारायण थारवानी, रवी थारवानी व पवन थारवानी यांनी त्यांना अडवले. यावेळी जुन्या वादातून भांडण झाले, आणि नंतर मारहाण झाली. दरम्यान, नारायण थारवानी याने चाकूने सागर यांच्यावर वार केला. सागर यांच्यासोबत असलेल्या गौरव कुकरेजा यालाही आरोपींनी मारहाण केली. जखमी सागर कुकरेजा यांना नागरिकांच्या मदतीने तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी भुसावळ बाजार पोलिस ठाण्यात सागर कुकरेजा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.



