November 7, 2026 3:01 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » निंभोरा परिसर हादरला; अपघातानंतर कारमधून बाहेर पडताना युवक विहिरीत कोसळला !

निंभोरा परिसर हादरला; अपघातानंतर कारमधून बाहेर पडताना युवक विहिरीत कोसळला !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील निंभोरा बु. येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोदा–निंभोरा रस्त्यावरील दसनूर फाट्याजवळ झालेल्या चारचाकी वाहन अपघातात कारमधून बाहेर पडताना युवक शेतातील विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. ही घटना दि. २८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक विलास चौधरी (वय १९, रा. निंभोरा बु.) हा आपल्या मित्रांसोबत सावदा येथून कार (क्रमांक एम.एच. १३ बी.एन. ९०९१)ने निंभोऱ्याकडे परत येत होता. कार संस्कार प्रकाश चौधरी चालवत होता. दसनूर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. अपघातानंतर कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना दीपक चौधरी याचा शेतातील विहिरीत पडल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघातात संस्कार चौधरी, कुणाल शरद बारबंद, शुभम दत्तू दोडके, नितीन अरुण चौधरी व गणेश अशोक कुंभार हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी नथू रामभाऊ चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!