September 21, 2026 11:27 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » ताज्या » ५० वर्षीय प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय !

५० वर्षीय प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

घरामध्ये सर्वजण असताना वरील मजल्यावर भालेराव एकनाथ बाविस्कर (५०, रा. कानळदा, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २१ जुलैला कानळदा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेतीकाम करणारे भालेराव बाविस्कर हे कुटुंबासह कानळदा येथे राहत होते. घराच्या खालच्या खोलीमध्ये कुटुंबातील सदस्य असताना बाविस्कर यांनी वरील मजल्यावर गळफास घेतला. समोरील घरामध्ये राहणाऱ्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले व ही घटना समोर आली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!