September 26, 2026 12:38 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » राष्ट्रीय » अल्पवयीन मुलाने चाकूच्या धाकावर केला महिलेचा अत्याचार !

अल्पवयीन मुलाने चाकूच्या धाकावर केला महिलेचा अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मुंबई शहरात मोठी गुन्हेगारी फोफावत असतांना नुकतेच मानखुर्द येथे अवघ्या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाने घरात घुसून 27 वर्षांच्या महिलेवर अत्याचार केला. यामुळेच प्रचंड खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला सध्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला ही एक गृहिणी असून ती पती व मुलांसह मानखुर्द येथे राहते. सोमवारी दुपारी ही महिला तिच्या दोन मुलांसह घराच्या दरवाजाजवळ बसली होती, तर तिचा नवरा तेव्हा कामावर गेला होता. तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तो घरात घुसला, त्यानंतर त्याने दरवाजा आतून बंद केला आणि महिलेला चाकूचा धाक दाखवला. महिलेने प्रतिकार केल्यास तिला व तिच्या मुलांना जीवे मारेन अशी धमकीही त्याने दिली.

त्यानंतर त्या आरोपीने महिलेवर बळजबरी करत अत्याचार केला आणि नंतर बाहेर येऊन, दरवाजा लावून घेत घटनास्थळवारून पळ काढला. मदतीसाठी त्या महिलेने आरडाओरडा सुरू केला, ते ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेऊन दरवाजा उघडला. घडलेल्या घटनेची त्यांनी त्या महिलेच्या पतील तसेच पोलिसांनाही माहिती दिली. पीडितेच्या जबानीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला, संशयिताचा शोध घेण्यासाठी आठ पोलिस पथके तयार करण्यात आली. अल्पवयीन आरोपी हा स्थानिक रहिवासी असून घटनेपासून फरार होता.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!