November 9, 2026 11:41 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » 8 वर्षांनंतर फरार आरोपी अटकेत; ११ लाख किमतीचे सोने जप्त : रामानंद नगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

8 वर्षांनंतर फरार आरोपी अटकेत; ११ लाख किमतीचे सोने जप्त : रामानंद नगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

जळगाव : प्रतिनिधी

तब्बल 8 वर्षांपासून फरार असलेल्या सोन्याच्या अपहार प्रकरणातील आरोपीस रामानंद नगर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून अटक केली असून, त्याच्याकडून 11 लाख 90 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  दि. 30 मार्च 2017 रोजी सचिन वसंतराव भामरे (रा. गांधी नगर, जळगाव) यांनी त्यांच्या साई ज्वेलर्स या पिंप्राळा परिसरातील दुकानात काम करणाऱ्या सुशांत सुनिल कुंड्डु (रा. हावडा, पश्चिम बंगाल) या कामगारास दागिने तयार करण्यासाठी सुमारे 30 तोळे सोने दिले होते. मात्र, आरोपीने ते सोने अपहार करून पसार होत आपल्या मूळ गावी पश्चिम बंगालला पलायन केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 42/2017 भादंवि कलम 408, 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.  गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांनी वेळोवेळी आरोपीच्या शोधासाठी त्याच्या मूळ गावी प्रयत्न केले होते, मात्र तो सापडत नव्हता. तरीही हा गुन्हा ‘कायम तपास’वर ठेवत तपास यंत्रणा सतत कार्यरत होती.

सपोनि भुषण कोते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक वाराणसी, उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले. तेथे शोधमोहीम राबवून आरोपी सुशांत कुंड्डु (वय 39) यास ताब्यात घेण्यात आले. त्यास दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली. सपोनि भुषण कोते यांनी तपास पुढे सुरू ठेवत, आरोपीकडून कोलकाता, पश्चिम बंगाल येथून अपहार केलेले सुमारे 100 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 11 लाख 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले.

या कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भुषण कोते, पो.ह. जितेंद्र राजपुत, पो.ना. योगेश बारी, पो.शि. अनिल सोननी, दिपक वंजारी, अतुल चौधरी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.  या उल्लेखनीय तपासामुळे तब्बल आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायाची प्रक्रिया पुढे सरकली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाने दाखवलेली चिकाटी आणि सातत्य हे खरोखरच कौतुकास्पद असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याच्या दृष्टीने हे पाऊल मोलाचे आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!