November 8, 2026 5:22 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » “राधाकृष्णनांच्या राजीनाम्यानंतर आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्यपालपदाची सूत्रे”

“राधाकृष्णनांच्या राजीनाम्यानंतर आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्यपालपदाची सूत्रे”

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज राजभवनात पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील काही मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि इतर खास निमंत्रित उपस्थित होते.

गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेल्या आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांनी शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

शपथविधी सोहळ्यानंतर राजभवनात अधिकृत स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विविध मान्यवरांनी आचार्य देवव्रत यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा उल्लेख करत, त्यांच्या कार्यकाळात राज्यपालपदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला. याआधी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ११ सप्टेंबर रोजी अधिकृत आदेश जारी करून आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. गुजरातहून तेजस एक्स्प्रेसने मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल आणि त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांचे स्वागत केले. त्यांना रेल्वे पोलिस आणि मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!