September 21, 2026 11:27 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » राष्ट्रीय » आता युती होणे शक्य नाही ; माजी खासदाराचे विधान !

आता युती होणे शक्य नाही ; माजी खासदाराचे विधान !

नंदुरबार : वृत्तसंस्था 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दुरावलेल्या नेत्यांना जवळ केले जात असून यामुळे पुन्हा हे नेते ‘स्व’गृही परतत आहेत. भाजपच्या लोटस अॅापरेशनला मोठे यश मिळताना दिसत आहे. भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग वाढले आहे, अशातच नंदुरबारमधील राजकारणात गावित कुटुंबाचा दबादबा असून, याच कुटुंबातील माजी खासदार हिना गावित स्वगृही परतल्या आहेत. नुकताच त्यांचा पक्षप्रवेश झाला असून त्या भाजपात येताच त्यांनी स्थानिक निवडणुकीत अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

माजी खासदार हिना गावित यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत एक मोठं वक्तव्य करत भूमिका स्पष्ट केली आहे. नंदुरबार आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार नाही, अशी माहिती हिना गावित यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी युती का होणार नाही याचे कारणही सांगितले आहे. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत स्थानिक पातळीवर वाद आहेत. यामुळेच युती होणे शक्य नाही, असे हिना गावित यांनी सांगितले.

महायुतीने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेसाठी एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे या अगोदरच स्पष्ट केले होते. तर राज्यातील इतर ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई शिवसेनेच्या विरोधातच आहे, असे देखील हिना गावित म्हणाल्या आहेत.

नंदुरबारमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर हिना गावित या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, ज्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!