November 16, 2026 2:56 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » ब्रेकिंग : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचा अपघात !

ब्रेकिंग : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचा अपघात !

अहमदाबाद : वृत्तसंस्था

गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी आज दुपारी  एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ७३७ कोसळले आहे.  अपघाताचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्या. त्याच वेळी, काळ्या धुराचे ढग दूरवरून दिसतात. या विमानात २४२ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुरुवातीच्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ विमान कोसळल्याचे मानले जात आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे

चित्रात विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसते. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. हा अपघात झाला तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते. हे विमान एअर इंडियाचे असू शकते. सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे, हा भीषण अपघात पाहून लोक घाबरले आहेत आणि इकडे तिकडे धावत आहेत. विमान पूर्णपणे खराब झाले आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून खाक झाला आहे. ज्या इमारतीवर विमान कोसळले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. विमानतळाजवळ एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!