November 7, 2026 3:56 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » कुलूप तोडून घरात प्रवेश; इद्रप्रस्थ नगरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

कुलूप तोडून घरात प्रवेश; इद्रप्रस्थ नगरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील इद्रप्रस्थ नगर परिसरात देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५१ हजार ६२६ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी प्रतिभा डिगंबर काळे (वय ४९) या आपल्या कुटुंबासह दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता शेगाव येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन लोखंडी कपाटे उघडून त्यातील १ ग्रॅम वजनाचे आठ सोन्याचे मणी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीचे तांबण तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास करण्यात आला.

 सायंकाळी सुमारे ५ वाजता कुटुंब घरी परतल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी प्रतिभा काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शहरात बंद घरांना लक्ष्य करून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!