November 6, 2026 12:03 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » ‘सुभाषला पकडून मार,’ घरगुती वादातून जीवघेणा हल्ला !

‘सुभाषला पकडून मार,’ घरगुती वादातून जीवघेणा हल्ला !

भुसावळ : प्रतिनिधी

निवृत्त रेल्वे पोलिस हेकॉ. सुभाष शंकरराव चिखलकर (६८, रा. विघ्नहर्ता कॉलनी) यांच्यावर घरगुती वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखलकर यांनी पत्नी, मुलगी आणि इतर तिघांसह एकूण पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि.१९ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चिखलकर हे त्यांच्या पत्नी संगीता आणि मुलगी नेहा यांच्यासोबत घरी होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे संतोष सुखदेव अटवेकर आणि त्याची आई सखुबाई अटवेकर घरी आले. घरात प्रवेश करण्यास चिखलकर यांनी विरोध केल्यानंतर वाद निर्माण झाला. संतोष अटवेकरने ‘हे घर नेहाचे आहे, तुला राहण्याचा अधिकार नाही,’ असे म्हणत चिखलकर यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर संतोष सखुबाई, संगीता व नेहाने मिळून घरात पडलेल्या काठ्यांनी चिखलकर यांच्यावर हल्ला केला. संगीताने नेहाला तलवार आणण्यास सांगून हल्ल्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता, संतोष आणि संगीताने चिखलकर यांचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. घराबाहेर उभ्या असलेल्या गजानन व्यंकटेशन गुरुशेट्टी याला ‘सुभाषला पकडून मार,’ असे सांगण्यात आले. त्यानेही चिखलकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुभाष चिखलकर यांनी प्रसंगावधान राखत तिथून सुटका करून घेतली आणि आपल्या पहिल्या पत्नी मंगला यांच्याकडे दत्तनगर येथे पोहोचले. त्यानंतर, त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात पत्नी संगीता, मुलगी नेहा, संतोष अटवेकर, सखुबाई अटवेकर आणि गजानन गुरुशेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!