November 13, 2026 11:56 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » शहरं » विद्यापीठाच्या हेल्थ केअर सेंटरमध्ये डॉक्टर झोपेत; निष्काळजीपणाचा फोटो व्हायरल

विद्यापीठाच्या हेल्थ केअर सेंटरमध्ये डॉक्टर झोपेत; निष्काळजीपणाचा फोटो व्हायरल

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरालगत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले हेल्थ केअर सेंटर सध्या एका गंभीर निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. या केंद्रातील कार्यरत डॉक्टर कर्तव्याच्या वेळेतच खुर्चीवर पाय करून झोपलेले असल्याचा प्रकार समोर आला असून, त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या या हेल्थ केअर सेंटरमधील ही घटना चिंताजनक मानली जात आहे. कामाच्या वेळेत डॉक्टर उपचाराऐवजी झोपेत असल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत न मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारामुळे आरोग्य सेवेत निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर आणि सेवा नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. संबंधित घटनेची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टरवर योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच हेल्थ केअर सेंटरच्या कार्यपद्धतीवर प्रशासनाने कठोर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे विद्यापीठाच्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाकडून याबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!