November 12, 2026 10:31 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » जामनेर तालुक्यात भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार !

जामनेर तालुक्यात भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार !

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पहूर-जामनेर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ दुचाकी व अवजड वाहनाच्या भीषण अपघातात जामनेरातील तीन व पहूरचा एक असे चार तरुण जागीच ठार झाले तर अवजड वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घडली.

अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे व अजय (पूर्ण नाव माहीत नाही, तिघे रा. जामनेर) तसेच रवींद्र सुनील लोंढे (रा. पहूर) अशी मयतांची नावे आहेत. हे सर्व २२ ते २४ वयोगटातील आहेत. अपघातग्रस्त अवजड वाहनात जनावरांची हाडे आढळली. ही हाडे कोठून कोठे नेली जात होती, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच जखमी अवजड वाहन चालकाचे नावदेखील रात्री उशिरापर्यंत कळू शकले नव्हते.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तसेच गोपाळ माळी, जीवन चव्हाण, ईश्वर कोकणे यांनी धाव घेतली. पहूरचे सरपंच अब्बू तडवी व ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील तेथून जात असताना त्यांनी थांबून जखमीला जामनेर रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. चारही मृतदेह जामनेर रुग्णालयात आणल्यावर मृतांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!