September 27, 2026 7:08 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

एमआयडीसीत बॅग लिफ्टिंग प्रकरण उघड ; दोन आरोपीसह ८ लाखांची रोकड हस्तगत !

जळगाव  : प्रतिनिधी  एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश करून तब्बल ८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडे आहे. सविस्तर वृत्त असे की ,  १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विलास मधुकर जाधव (वय ६७, रा. जुनी जोशी […]

राष्ट्रपती मुर्मूंचा संदेश : संविधान हा गुलामगिरीतून स्वाभिमानी भारताकडे नेणारा मार्गदर्शक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संविधान हा देशाच्या अस्मितेचा पाया आहे आणि गुलामगिरी सोडून राष्ट्रवादी मानसिकता स्वीकारण्यासाठी मार्गदर्शक दस्तऐवज आहे. स्वातंत्र्यानंतर, संविधान सभेने भारताची अंतरिम संसद म्हणूनही काम केले. डॉ. भीमराव अर्थात बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. २०१५ मध्ये, बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष, दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा […]

पवार परिवारात लगीन घाई : युगेंद्र अन् जय पवार ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभर सध्या नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत. कारण पवार कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू आहे. अजित पवारांचे पुतणे तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध बारामतीतून उतरलेले युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा येत्या ३० नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत […]

नाना पाटेकरांचा तरुणांना संदेश : “गर्दीचा भाग बनू नका, विचार करून पुढे जा”

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक आरोप प्रत्यारोप करीत असताना आता  सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी मतदारांना आवाहन केले आहे. सध्या आपल्या अवतीभोवती जे पाहून दुःख होते. मी कधीच जात-धर्म मानत नाही. काही चालू आहे ते मात्र, काही राजकीय शक्ती जाती-धर्माच्या आधारावर समाजात […]

खळबळजनक : क्षुल्लक कारणाने पती – पत्नीने घेतला टोकाचा निर्णय : दोन मूल झाली पोरकी !

वाशिम : वृत्तसंस्था  गेल्या काही वर्षापासून छोट्या मोठ्या कारणाने अनेक व्यक्तीनी टोकाचा निर्णय घेवून आयुष्य संपविल्याच्या घटना घडल्या आहे. यात आता वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील सवासनी गावात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आणि संपूर्ण गावाला दुःखाच्या छायेत जावं लागलं. पती–पत्नीमधील किरकोळ वाद इतका वाढला की दोघांचेही जीव घेतला. शेतातील विहिरीत उडी मारून पत्नीने आत्महत्या […]

वाढदिवसाच्या नावाखाली तरुणावर पेट्रोल ओतून जीवघेणा हल्ला!

मुंबई : वृत्तसंस्था विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या हद्दीत 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री वाढदिवसाच्या नावाखाली एका 21 वर्षीय तरुणावर झालेला जीवघेणा हल्ला उघडकीस आला आहे. परिचित पाच जणांनी वाढदिवसाच्या बहाण्याने बोलावून अब्दुल रहमान याच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री बरोबर बारा वाजता पाचही आरोपींनी “वाढदिवस […]

रामानंद पोलिसांची मोठी कामगिरी : २४ लाखांचा गुटखा जप्त !

जळगाव : प्रतिनिधी राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतुक करणारे वाहनावर रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. त्या वाहनातून सुमारे ३० लाख २० हजार रुपयांचा गुटख्यासह वाहन चालक किरण भास्कर नांदरे (वय ४३, रा. सेन्ट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा […]

लग्नमंडपात लग्न लागल्यानंतर नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू !

अमरावती : वृत्तसंस्था थाटामाटात लग्न लागल्यानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पुसला येथे मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली. वऱ्हाड्यांनी खचाखच भरलेला मंडप क्षणातच रिकामा झाला.अमोल प्रकाश गोडबोले (३१, रा. पुसला) असे मृत नवरदेवाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल महसूल सेवक म्हणून […]

घराचे गेट उघडत असताना चोरट्यांची झडप ; सोन्याची पोत समजून बेन्टेक्सची पोत लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी अयोध्यानगरात घरासमोर दुचाकी लावून गेट उघडत असलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी ओढून नेली. पोत बेन्टेक्सची असल्यामुळे संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली नाही. हा प्रकार २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडला. मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती अनिल इंगळे या रात्री घराजवळ आल्या. त्यांनी दुचाकी लावून गेट उघडत असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांपैकी […]

जामनेर तालुक्यात भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर-जामनेर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ दुचाकी व अवजड वाहनाच्या भीषण अपघातात जामनेरातील तीन व पहूरचा एक असे चार तरुण जागीच ठार झाले तर अवजड वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घडली. अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे व अजय (पूर्ण नाव माहीत नाही, […]

error: Content is protected !!