November 5, 2026 11:37 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » महाराष्ट्र » “सल्ले द्यायचे असतील तर भेटूच!” – पत्रकारांना, वाचकांना उत्सुक करेल ; राज ठाकरे !

“सल्ले द्यायचे असतील तर भेटूच!” – पत्रकारांना, वाचकांना उत्सुक करेल ; राज ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट मुंबईसह विविध शहरांतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित होती. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सत्ताधाऱ्यांना काही चांगले सल्ले द्यायचे असतील, तर त्यांना भेटणे हे केवळ नैसर्गिक आहे आणि त्यात कुठेही राजकारण शोधण्याची गरज नाही.

राज ठाकरे म्हणाले, “पूर्वीसारखे निकोप राजकारण आता नाही. निवडणुका संपल्या आहेत आणि आता जेव्हा शिंदे सत्तेत आहेत, तेव्हा आम्हाला शहरांच्या मूलभूत समस्या सांगणे गरजेचे आहे. कुणी कुणाला भेटले की लगेच राजकारण शोधले जाते, पण त्यात काहीच गरज नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन.”

त्यांनी मुंबईसह पुणे, ठाणे आणि इतर शहरांतील रस्ते, पूल, उड्डाणपुले आणि रिडेव्हलपमेंटसारख्या समस्यांवर सखोल चिंता व्यक्त केली. राज ठाकरेंनी स्पष्ट केले की, “पूर्वी जिथे 40-50 माणसे राहत होत्या, तिथे आज 400 लोक राहतात, जागा त्याच आहे, रस्ते तेच आहेत. शहरांत आता अनेक गाड्या पार्किंगमध्ये न जाता रस्त्यावर उभ्या राहतात. या सर्व गोष्टींवर शिस्त आणणे गरजेचे आहे.”

त्यांनी ऑटो, उबेर, ओला सारख्या वाहतूक कंपन्यांवरील नियमांच्या पालनाचीही कमतरता याच संदर्भात उचलली आणि म्हटले की, “लोकांचा विश्वास बसत नाही, पण शिस्त येईपर्यंत शहरांना समस्या भेडसावतील.”

राज ठाकरे म्हणाले की, त्यांनी शिंदेंशी चर्चा करताना सर्व महत्त्वाच्या मुद्यांची माहिती दिली आणि संबंधित फाईल भूषण गगराणी यांच्याकडे पाठवली आहे. पुढील कारवाई त्यांच्याकडून होईल, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या या भेटीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहीजण याला सत्तेच्या गळ्यात बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, ही भेट शहरांच्या विकासासाठी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी होती, राजकारणासाठी नव्हती.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!