September 24, 2026 10:26 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » हॉटेलच्या रूममधून वृद्धेच्या गळ्यातील दागिने लंपास !

हॉटेलच्या रूममधून वृद्धेच्या गळ्यातील दागिने लंपास !

जळगाव : प्रतिनिधी

नातेवाईकाच्या लग्नात आलेल्या वृद्ध महिलेला डिजेचा त्रास होत होता. त्यामुळे त्या हॉटेलच्या रूममध्ये आल्यावर तुमच्या गळ्याला काही लागले आहे असे सांगून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २१ ग्रॅमची आताच्या बाजारभावानुसार १ लाख ७८ हजाराची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना गुरूवारी रात्री ९.३० वाजता प्रेसिडेंट हॉटेलमध्ये घडली.

सविस्तर वृत्त असे कि, नागेश्वर कॉलनी येथे सिव्हील इंजिनिअर हेमंत जगन्नाथ न्याती हे कुटूंबासह राहतात. ६ रोजी भाचीच्या लग्न असल्याने ते आई पुष्पाबाई न्याती (वय ८५) यांना घेवून प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आले होते. रात्री ९.३० वाजता डिजेचा त्रास होत असल्याने पुष्पाबाई या केअर टेकर महिलेसोबत तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत गेल्या. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या मागे आला. काही वेळानंतर केअर टेकर महिला बाथरूममध्ये गेल्यावर वृद्ध महिला एकटी बसल्याचे पाहून त्या व्यक्तीने पुष्पाबाई यांची २१ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओढून नेली. त्यांनी हेमंत न्यातींना संपूर्ण प्रकार सांगितला. सीसीटीव्ही तपासल्यावर चोरटा सीसीटीव्हीत चित्रीत झाल्याचे दिसले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!