September 29, 2026 12:46 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » ताज्या » श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये १०८ मुलींचे कन्या पूजन

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये १०८ मुलींचे कन्या पूजन

जळगाव : प्रतिनिधी

नवरात्रोत्सव निमित्त आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण मध्ये १०८ मुलींचे कन्या पूजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेच्या सर्व उपशिक्षिका यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व उपशिक्षिका स्वाती नाईक यांनी सर्वप्रथम मुलींचे पाय धुतले. त्यांनतर हळद कुंकू लावले. आज सकाळी११ वाजता शाळां मधील मुलींनी जय माता दी चा जयघोष केला. भुलाबाई महोत्सवा निमित्त शाळेमध्ये मुलांसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मुलींनी भरपूर शिकावे. तुम्हाला ज्या गोष्टी शिकताना आनन्द होतो. तीच गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा. भरपूर वाचन करावे असे सांगितले. उपशिक्षिका सोनाली चौधरी व करिष्मा वंजारी यांनी मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!