November 8, 2026 3:24 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » बिबट्याने मारली झडप : चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !

बिबट्याने मारली झडप : चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !

नाशिक : वृत्तसंस्था

सिन्नर येथील शेतातील काम आटोपून घराकडे निघालेल्या आईसोबत जाणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याने झडप मारली. या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. शुक्रवारी (दि.20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोंदे शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली. जान्हवी सुरेश मेंगाळ वय वर्षे 4 असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेंगाळ कुटुंबीय गोंदे – दातली रस्त्यालगतच्या वस्तीवर वास्तव्यास आहे. मूळचे चास – नळवाडी येथील असलेले मेंगाळ कुटुंबीय काही दिवसांपासून शरद तांबे यांची शेती वाट्याने करीत आहेत. त्यांचे राहते घरापासून जवळच असलेल्या अरुण नाठे यांच्या शेतात भुईमूग काढण्याचे काम सुरू होते. आई मीना मेंगाळ यांच्यासोबत जान्हवी शेतात खेळत होती. काम आटोपल्यानंतर आई सोबत जात असतानाच ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला आणि तिची मान जबड्यात पकडली. हा प्रकार लक्षात येताच मीना मेंगाळ यांच्यासह सोबतच्या महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून धूम ठोकली. अवघ्या काही क्षणातच ही घटना घडली.

मानेला गंभीर दुखापत झालेल्या जान्हवीला तात्काळ सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तथापि प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी हलविण्याचा सल्ला दिला. सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमुकलीला तपासून मृत घोषित केले. या घटनेने गोंदेशिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान पोलीस पाटील ज्योती बाळासाहेब तांबे यांनी पोलीस व वनविभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांकडून रात्री उशिरा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्यासह सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर उपस्थित होते. घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असल्याची माहिती पारेकर यांनी दिली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!