जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल पोलिस स्टेशनमधील कर्मचारी बापू लोटन पाटील हा ३ हजाराची लाच स्विकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाच्या जाळ्यात अडकला. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर धुळ्याला नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत देण्याकरिता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जळगावहून एरंडोल येथे बदली होऊन आलेला पोलिस हवालदार बापू लोटन पाटील याने म्हसवे (ता. पारोळा) येथील तक्रारदाराकडून पैशांची मागणी केली. विशेष म्हणजे तक्रारदार हा स्वतः अपघातात जबर जखमी झालेला असतानाही त्याच्याकडून पैशांची अवास्तव मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ३ हजार रुपयात प्रकरण मिटविण्याचे ठरले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार याने बापू पाटील याला एरंडोल हायवे चौफुली येथे रक्कम घेण्यासाठी बोलावले. तक्रारदाराकडून बापू लोटन पाटील हा ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



