Home » जळगाव » लग्नमंडपात लग्न लागल्यानंतर नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू !

लग्नमंडपात लग्न लागल्यानंतर नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू !

अमरावती : वृत्तसंस्था

थाटामाटात लग्न लागल्यानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पुसला येथे मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली. वऱ्हाड्यांनी खचाखच भरलेला मंडप क्षणातच रिकामा झाला.अमोल प्रकाश गोडबोले (३१, रा. पुसला) असे मृत नवरदेवाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल महसूल सेवक म्हणून कार्यरत होता. त्याचे लग्न नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील तेजस्विनी हिच्याशी ठरले. मंगळवारी त्याचा लग्नसोहळा पुसला येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सकाळपासून लग्नमंडपी वऱ्हाडी मंडळींची मांदियाळी सुरू होती. सनईचे मंजुळ स्वर कानी पडत होते. वाजतगाजत नवरदेव अमोल लग्नमंडपात दाखल झाला. अक्षदांची उधळण करत मंगलाष्टाकांच्या मंजुळ स्वरात अमोल व तेजस्विनी या दोघांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. लग्न लागताच थोरा मोठ्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देणे सुरू झाले. त्याचवेळी अमोल याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो घामाघूम झाला. त्याला तातडीने उपचारासाठी पुसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत सारे संपले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *