November 14, 2026 8:19 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » ‘त्या’ व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली !

‘त्या’ व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील एका बंगाली सुवर्ण व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याला दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडवले. त्याला दुचाकीवरुन सोबत पोलीस ठाण्यात घेवून जात त्याच्याकडून लाखो रुपये घेणारे शनिपेठ पोलिस ठाण्याचे दोघ पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारा बंगाली सुवर्ण व्यावसायीक काही दिवसांपुर्वी सोने व काही रक्कम सोबत घेऊन जात होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडे चौकाकडे जात असतांना, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करीत पांडे चौकात पकडले. तसेच त्याच्याकडे असलेले सोने हे अवैध असल्याचे सांगत त्याला दोघांनी दुचाकीवर बसवून शनिपेठ पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने ही रक्कम संबंधित व्यापाऱ्यास परत मिळाली. मात्र या विषयी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार करण्यात आली होती. व्यापाऱ्याला त्याची रक्कम परत मिळाली मात्र हा विषय गंभीर असल्याने त्याची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी पैसे घेणाऱ्या दोघ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे तातडीने आदेश काढले. यामध्ये कमलेश पाटील यांची मारवड तर विक्की इंगळे यांची पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!