November 9, 2026 5:18 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » सततच्या भांडणातून पत्नीने केला पतीचा खून ; जिल्हा पुन्हा हादरला !

सततच्या भांडणातून पत्नीने केला पतीचा खून ; जिल्हा पुन्हा हादरला !

रावेर : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना व खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना आता रावेर तालुक्यातील निंभोरा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रात्री घडली असून, यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. सततच्या भांडणातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा येथील रहिवासी हुसेन रसूल तडवी (वय-६२) आणि त्यांची पत्नी फर्जाबाई हुसेन तडवी (वय-५५) यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असत. घटनेच्या रात्रीही त्यांच्यात असेच भांडण झाले असावे. या भांडणातून राग अनावर झाल्याने आरोपी फर्जाबाईने कुऱ्हाडीने हुसेन तडवी यांच्यावर वार केले असावेत, असा सहायक पोलीस निरीक्षक श्री. बोचरे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. या हल्ल्यात हुसेन तडवी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी पत्नी फर्जाबाईला ताब्यात घेतले असून, तिची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!