Home » जळगाव » चुकीचा HIV रिपोर्ट; निर्दोष महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा धक्कादायक प्रकार!

चुकीचा HIV रिपोर्ट; निर्दोष महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा धक्कादायक प्रकार!

नशिराबाद प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गरजू महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आल्याने तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याची घटना उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला नियमित तपासणीसाठी नशिराबाद आरोग्य केंद्रात गेली होती. तेथून तिचे रक्तनमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले. काही दिवसांनी आलेल्या अहवालात तिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. हा अहवाल मिळताच महिलेच्या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळले.

मात्र, संशय आल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्या दोन खाजगी लॅबमध्ये पुन्हा तपासणी केली असता दोन्ही ठिकाणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे आधीचा अहवाल चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यापूर्वीही संबंधित लॅबविरोधात रिपोर्ट वेळेवर न देणे, विलंबाने अहवाल देणे तसेच नमुने हरवण्याच्या तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे. तरीही अशा संस्थांवर ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, ही घटना घडून अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित लॅब आणि अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी

दोषींवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा हा प्रकार म्हणजे थेट जनतेच्या जीवाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत असून, आरोग्य विभागाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *