Home » जळगाव » जळगावात लाचखोरीचा पर्दाफाश; १ लाख घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या ताब्यात

जळगावात लाचखोरीचा पर्दाफाश; १ लाख घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या ताब्यात

पब्लिक लाईव्ह न्यूज | दि. १४ जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत शनीपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विनोद पितांबर अहिरे (वय ४०) असे असून तो शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
प्रकरण नेमके काय?
तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी आणि त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपी अहिरे यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
सापळा रचून कारवाई
१३ एप्रिल रोजी एसीबीच्या पथकाने शनीपेठ परिसरात सापळा रचला. तडजोडीनंतर ठरल्याप्रमाणे आरोपीने १ लाख रुपये स्वीकारताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ नुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे आणि अमोल सूर्यवंशी यांचा समावेश होता.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *