Home » जळगाव » विनोबा अॅपतर्फे गुणवंत शिक्षकांचा गौरव; जळगाव जिल्ह्यातील १२ शिक्षक व उत्कृष्ट क्लस्टर्सचा सन्मान

विनोबा अॅपतर्फे गुणवंत शिक्षकांचा गौरव; जळगाव जिल्ह्यातील १२ शिक्षक व उत्कृष्ट क्लस्टर्सचा सन्मान

जळगाव | प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी ओपन लिंक्स फाउंडेशनच्या ‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठांतर्गत Post of the Month (POM), Contest, Morning Assembly आणि Top Cluster – मे २०२६ या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या १२ गुणवंत शिक्षकांसह उत्कृष्ट क्लस्टर्सचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

Post of the Month (POM) पुरस्कारासाठी राहुल पाटील (बिडगाव, चोपडा), योगिता लोखंडे (पिंप्री बुद्रुक, धरणगाव), नीता काकर (घोडसगाव, मुक्ताईनगर) आणि उमा वानखेडे (जळू, एरंडोल) यांचा सन्मान करण्यात आला.

Contest विभागात शीतल सोनार (सोनवड बुद्रुक, धरणगाव), मनीषा पवार (खर्ची खुर्द, एरंडोल), अनिता शिंगारे (तोरणाळे, जामनेर) आणि विनोद धनगर (सारोळे बुद्रुक, पाचोरा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Morning Assembly विभागात पल्लवी शिंदे (हातेड, चोपडा) यांना गौरविण्यात आले. तसेच Top Three Cluster म्हणून सोनवड क्लस्टर (केपी सुनील पाटील), तोरणाळे क्लस्टर (केपी दीपक सर) आणि रिंगणगाव क्लस्टर (केपी मनीषा सोनवणे) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी निलेश रत्ना देविदास पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, नरेंद्र चौधरी आणि विजय सरोदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत शिक्षणात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.

‘विनोबा’ पुरस्कार हा केवळ सन्मान नसून शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याला मिळालेली समाजाची आदराची पावती असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्याचे नियोजन व समन्वय हितेश भालेराव, सचिन ससाणे (जिल्हा समन्वयक) तसेच ओपन लिंक्स फाउंडेशन, टीम जळगाव यांनी यशस्वीपणे पार पाडले.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *