September 9, 2026 6:33 pm

Home » जळगाव » जळगाव–म्हसावद रेल्वेमार्गावर उद्या १२ तासांचा ब्लॉक; सहा मेमू रद्द; ९ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

जळगाव–म्हसावद रेल्वेमार्गावर उद्या १२ तासांचा ब्लॉक; सहा मेमू रद्द; ९ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जळगाव ते म्हसावददरम्यान रेल्वे वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. जळगावशिरसोलीम्हसावद या रेल्वेमार्गावर अप आणि डाऊन दोन्ही दिशांना स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. या कामासाठीसप्टेंबरला तब्बल १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून ७ सप्टेंबरला पूर्व-नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जातील. त्यानंतर ८ सप्टेंबरला सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत नॉन-इंटरलॉकिंगचे मुख्य काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवून नियमन केल्या जाणार आहेत.

सहा मेमू गाड्या रद्द

ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबरला सहा मेमू गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये ११११९ इगतपुरी–भुसावळ, १११२० भुसावळ–इगतपुरी, ११११३ भुसावळ–देवळाली, ११११४ देवळाली–भुसावळ, ६११२९ नाशिक रोड–बडनेरा आणि ६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमूचा समावेश आहे.

एक्स्प्रेस गाड्यांना विलंब

ब्लॉकमुळे अमृत भारत एक्स्प्रेससह अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासावरही परिणाम होणार आहे. २२५९० हडपसर–बनारस अमृत भारत एक्स्प्रेसला माहेजी येथे २ तास ५० मिनिटे, तर १२६२७ बेंगळुरू–नवी दिल्ली एक्स्प्रेसला पाचोरा येथे १ तास ४० मिनिटे नियमन केले जाणार आहे. ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस–छपरा एक्स्प्रेसला गालन येथे १ तास ३५ मिनिटे, तर २२३६० मुंबई–पटना एक्स्प्रेसला कजगाव येथे १ तास १५ मिनिटे थांबविण्यात येणार आहे.

याशिवाय १७३६३ हुबळी–योगनगरी ऋषिकेश, ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस–जयनगर, २२५११ लोकमान्य टिळक टर्मिनस–कामाख्या, ११०७२ बलिया–लोकमान्य टिळक टर्मिनस, २२५८९ बनारस–हडपसर अमृत भारत, ११०५८ अमृतसर–मुंबई, २२८४६ हटिया–पुणे, २२५३७ गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस, ११०६२ जयनगर–लोकमान्य टिळक टर्मिनस, ११०४० गोंदिया–कोल्हापूर, ११०११ मुंबई–धुळे, १२७५३ नांदेड–निजामुद्दीन, १२७१५ नांदेड–अमृतसर आणि १२१०३ पुणे–लखनऊ एक्स्प्रेसच्या वेळेतही नियमन करण्यात येणार आहे.

दोन गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल

८ सप्टेंबरच्या प्रवासासाठी २६१०२ अजनी–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने दुपारी १२.५० वाजता अजनीहून सुटेल. तसेच १९००४ भुसावळ–दादर एक्स्प्रेस भुसावळहून सायंकाळी ६.४० वाजता रवाना होईल.

रेल्वे भागाकडून आवाहन

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, भविष्यात रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी ८ सप्टेंबरला प्रवासाचे नियोजन करताना बदललेल्या वेळापत्रकाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे रेल्वे विभागाकडून आवाहन केले आहे.

 

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!