Home » जळगाव » ‘त्या’ अपघातातील रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू !

‘त्या’ अपघातातील रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ शनिवार दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावरुन जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाने ट्रकवरिल नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरुन रिव्र्व्हस येणाऱ्या ट्रकने उड्डाणपुलाशेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यात उपचार घेत असलेले सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) यांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सुरत रेल्वेगेटजवळ असलेल्या मालधक्क्यावरुन सिमेंट लोड करुन (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजी नगरच्या उड्डाणपुलावरुन जात होता. उड्डाणपुलावरील काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रक हा उतारावरुन मागच्या बाजूने रिव्र्व्हस येवू लागला. ट्रक हा पुर्णपणे लोड असल्याने तो भरधाव वेगाने रिव्हर्स येत होता. यात तीन रिक्षासह चार ते पाच दुचाकींना चिरडल्याची घटना घडली होती. यात राधाकृष्ण नगरातील रहिवासी व रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) हे देखील या रिक्षा थांब्यावर उभे असतांना त्यांना ट्रकने जबर धडक दिल्याने ते जखमी झाले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचार सुरु असतांना दि.२२ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

राधाकृष्ण नगरातील रहिवासी सुरेश रूपचंद जैस्वाल हे रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिवार्ह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून दि.२३ रोजी दुपारी ४ वाजता निघणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *