Home » महाराष्ट्र » शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी ; अनिल अडकमोल !

शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी ; अनिल अडकमोल !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज दि.२१ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आ.) महानगरअध्यक्ष अनिल अडकमोल  यांनी सततच्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे मोफत धान्य वाटप तसेच ई-केवायसी करण्यास अडचण शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी यासाठी निवेदन सादर केले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते की, शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने माहे जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याच्या धान्य वाटपास तसेच शिधापत्रिका धारकाच्या प्रायेक माणसाची ई-केवायसी करण्याकरिता ३१ जुलै २०२५ पर्यंत शेवटची मुदत दिली असून, नाही केली तर मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही, असे म्हणणे आहे, तर दुसरीकडे मात्र सततच्या सव्र्व्हर प्राब्लेममुळे ई पॉस मशिन वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे मोफत धान्य वाटपास शासनाने ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढीव मुदतवाढ द्यावी, तसेच अत्योदय शिधापत्रिका धारकांना गेल्या वर्षभरापासून सवलतीच्या दरात मिळणारी एक किलों साखर ही बंद करण्यात आली असून येत्या काही दिवसात सण उत्सव ची सुरवात होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना साखर सुद्धा पूर्ववत सुरू करावी, तसेच शिधापत्रिका धारकांच्या घरातील प्रत्येकांची ई-केवायसी योजना हि निरंतर सुरू ठेवावी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे.

सर्वसामान्य ग्रामिण भागातील कामगार कष्टकरी महिला या आपले काम घंटे बुढवून तासन तास रेशन दुकानावर उने राहत आहेत व स्वस्त धान्य दुकानदारांशी नाराजी व्यक्तकरीत आहे व अखेरीस रेशन दुकानावर चकरा मारून वापस जात आहेत. त्यामुळे शासनाने सर्व्हर प्राब्लेमला येणारी अडचण सोडवून ई-पॉस मशिन सुरळीत सुरू केली तर प्रत्येक शिधापत्रिका धारकांना वेळेवर धान्य मिळून शासनाच्या योजनेचे उद्दिष्ठ सफल होण्यास मदत होईल, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, नरेंद्र मोरे, मिलिंद अडकमोल, अरुण बनसोडे, गौतम सोनवणे यांची उपस्थित होती.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *