Home » जळगाव » जळगावात २६ जूनपासून ‘जळगाव कॅरम लीग – पर्व २’चा थरार; ५६ खेळाडू ८ संघांतून भिडणार

जळगावात २६ जूनपासून ‘जळगाव कॅरम लीग – पर्व २’चा थरार; ५६ खेळाडू ८ संघांतून भिडणार

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडच्या पुरस्कृत ‘जळगाव कॅरम लीग – पर्व २’ या भव्य स्पर्धेचे आयोजन २६ ते २८ जून २०२६ दरम्यान कांताई सभागृह, जळगाव येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंसह राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॅरमपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ४८ खेळाडूंसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील जैन इरिगेशन व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले ८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडू सहभागी होणार आहेत. एकूण ५६ खेळाडूंना आठ संघांमध्ये विभागण्यात आले असून, स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने आणि त्यानंतर बाद फेरीच्या (नॉकआऊट) स्वरूपात खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके, आकर्षक चषक आणि एकूण ६५ हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना स्मृतिपदक (मेडल) प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सिस्का कंपनीच्या ‘बुलेट शॉट’ कॅरम बोर्ड आणि सोंगट्यांवर खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या आठ संघांमध्ये मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स, सालार किंग्स, स्पोर्ट्स हाऊस स्ट्रायकर्स, श्रीउत्तम हर्बल्स रायडर्स, लीजर स्पोर्ट्स स्टार्स, अरीश लायन्स आणि साईनाथ टायटन्स या संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघात संघमालक, आयकॉन खेळाडू, कर्णधार आणि इतर अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, विजेतेपदासाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे.

संघांची रचना पुढीलप्रमाणे आहे :

१) मकरा चॅलेंजर्स : संघमालक – युसुफभाई मकरा, आयकॉन – जैद फारुकी, कर्णधार – शेख हबीब. इतर खेळाडू – सलीम अन्सारी, नईम शेख, मोहसीन खान, सलमान खान आणि फारुख खान.

२) आप्पासाहेब लिजेंड्स :संघमालक – ॲड. रविंद्र कुलकर्णी, आयकॉन – अभिजीत त्रिपणकर, कर्णधार – फिरोज खान. इतर खेळाडू – अफजल शेख, मोहम्मद अली बागवान, सिद्दीक शेख, फैजान खान आणि शाहरुख भिस्ती.

३) सालार किंग्स :संघमालक – रेहान सालार, आयकॉन – योगेश धोंगडे, कर्णधार – आताऊल्लाह खान. इतर खेळाडू – नदीम शेख, जब्बार खान, उबेद खान, शेख नाझीम आणि रोशन खान.

४) स्पोर्ट्स हाऊस स्ट्रायकर्स :संघमालक – आमीर फारुक शेख, आयकॉन – पंकज पवार, कर्णधार – सय्यद मोहसिन. इतर खेळाडू – अय्युब खान, हुजेफा शेख, वसीम मलिक, सलमान शेख आणि रिजवान सय्यद.

५) श्रीउत्तम हर्बल्स रायडर्स :संघमालक – श्रीकांत रंगनाथ पाटील, आयकॉन – रहीम खान, कर्णधार – शेख जुबेर. इतर खेळाडू – अनिल मोरे, खालीद शेख, रंगनाथ पाटील, आरिफ बागवान आणि शेख मोहम्मद जैद.

६) लीजर स्पोर्ट्स स्टार्स :संघमालक – अश्फाक शेख, आयकॉन – निसार अहमद, कर्णधार – नईम अन्सारी. इतर खेळाडू – वसीम खान, अर्षद शाह, आदिल पठाण, परेश देशपांडे आणि सय्यद साबीर.

७) अरीश लायन्स :संघमालक – अरीश शेख, आयकॉन – संदीप दिवे, कर्णधार – अयाज शेख. इतर खेळाडू – जमीर खान, शेख अजीज, रेहान खान, अझहर शेख आणि अन्सारी साकिब.

८) साईनाथ टायटन्स :संघमालक – आसिफ खान, आयकॉन – अनिल मुंडे, कर्णधार – रईस शेख. इतर खेळाडू – दानिश शेख, सज्जाद खान, मुबशीर सय्यद, रईस सूर्या आणि शेख मेहमूद.

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २६ जून रोजी सकाळी १० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या तीन दिवसीय स्पर्धेत जिल्हा व राज्यातील अव्वल कॅरमपटूंचे सामने पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व कॅरमप्रेमी, क्रीडारसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *