Home » जळगाव » मध्यरात्री ३८ वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल !

मध्यरात्री ३८ वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव : प्रतिनिधी

रामेश्वर कॉलनी परिसरात कौतिक सुकलाल साळुंखे (वय ३८, मूळ रा. किनगाव, ता. यावल) या मिस्त्री काम करणाऱ्या व्यक्तीने बुधवार, दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कौतिक साळुंखे हे रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. काही वेळाने त्यांच्या पत्नीच्या हा प्रकार लक्षात आला. घरात साळुंखे दाम्पत्यासह त्यांची तीन लहान मुलेही होती. पतीला या अवस्थेत पाहून पत्नी आणि मुलांनी हंबरडा फोडला. कौतिक साळुंखे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *