जळगाव : प्रतिनिधी
पोळ्यानिमित्त सर्जा-राजाला फिरवून सर्वांसोबत हा सण साजरा केल्यानंतर रात्री गच्चीवर जाऊन ऋषीकेश विजय न्हावी (२३, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२२ ऑगस्ट) रात्री उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील ऋषिकेश न्हावी याने रात्रीपर्यंत गावात सर्जा-राजाला फिरविले. घरी गेल्यानंतर रागाच्या भरात तो गच्चीवर गेला व गळफास घेतला. त्याला शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहेत.



