November 4, 2026 11:34 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल जळगावच्या तीन पैलवानांची आंतरराष्ट्रीय भरारी! राजू मामा भोळे यांच्या सहकार्याने आशियाई चॅम्पियनशिपची संधी

Home » क्रिकेट » JCL 2026 Final : आज रंगणार अंतिम लढत; ‘मॅन ऑफ द लीग’ला पल्सर बाईक

JCL 2026 Final : आज रंगणार अंतिम लढत; ‘मॅन ऑफ द लीग’ला पल्सर बाईक

जळगाव दि. २६ प्रतिनिधी – जळगाव शहरातील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लिग (JCL) 2026 स्पर्धेचा महासंग्राम आज रंगणार आहे. रात्री ७.३० वाजेपासून ग्रॅण्ड फायनल सामन्याला सुरुवात होणार असून क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे.

स्पर्धेतील अंतिम सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्ज यांच्यात विजेतेपदासाठी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला असून आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामना संपल्यानंतर विजेत्या संघाला २ लाख रुपये रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे, तर उपविजेत्या संघाला १ लाख रुपये व ट्रॉफी प्रदान केली जाईल. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस ‘मॅन ऑफ द लीग’ पुरस्कार देत Bajaj Pulsar ही बाईक देण्यात येणार आहे.

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली व अलरीक इलेक्ट्रीकल्सच्या सहप्रायोजकत्वाखाली आयोजित या T-20 स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक निर्धाव चेंडू, सर्वोत्तम झेल आणि फेअर प्ले अशा विविध वैयक्तिक पुरस्कारांनीही खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे.

एलिमिनेटरमध्ये जामनेर हिरोजचा थरारक विजय

एलिमिनेटर सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज संघाने अवघ्या २ धावांनी चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. जामनेरने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात चाळीसगाव संघ १४८ धावांवर थांबला. कर्णधार ओम मुंडेने ८३ धावांची झुंजार खेळी केली, मात्र संघाला विजय मिळवता आला नाही.

आजच्या अंतिम सामन्यासाठी मैदानावर मोठी गर्दी अपेक्षित असून, जळगाव क्रिकेट लिगचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!