November 8, 2026 7:48 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » खळबळजनक : भाजपच्या महिला नेत्याला बदनाम करण्याची धमकी देत ३० लाखांची मागितली खंडणी !

खळबळजनक : भाजपच्या महिला नेत्याला बदनाम करण्याची धमकी देत ३० लाखांची मागितली खंडणी !

पाचोरा : प्रतिनिधी

येथील भाजपच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे धमकी देत चक्क ३० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी केली होती. त्या वेळी वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने वैशाली सूर्यवंशी यांना कुटनितीने तुम्हाला जिंकुन देतो, असे सांगितले होते. मात्र, वैशाली सूर्यवंशी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, सप्टेंबर २०२५मध्ये पुन्हा त्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाइलवरुन वैशाली सूर्यवंशी यांना फोन करुन धमकावण्याची भाषा केली. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पैसे वाटल्याची आक्षेपार्ह बनावट क्लिप तयार करुन सोशल मीडियावर टाकेल, तसेच इन्कमटॅक्स, सीबीआय, इडी यांच्याकडे तक्रार करेल, अशी धमकी देवून ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास समाजामध्ये तुमची, कुटुबांची बदनामी करेल, तुमच्या गाडीत ड्रग्स ठेवुन बदनामी करेल, अशीही धमकी दिली. दरम्यान, वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाणे गाठत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा तपास पो.नि. राहुलकुमार पवार करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!