November 15, 2026 1:22 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू : कुटुंबियांना बसला धक्का !

सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू : कुटुंबियांना बसला धक्का !

जळगाव  : प्रतिनिधी

घराबाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. त्याठिकाणी खेळत असलेल्या प्रेम नरेंद्र सोनवणे (वय ६, रा. सुजदे, ता. जळगाव) या चिमुकल्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुजदे गावात घडली. या घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबियांना धक्का बसला असून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील सुजदे गावात नरेंद्र सोनवणे हे वास्तव्यास असून ते शेती करतात, तर त्यांची पत्नी या गृहीणी आहेत. त्यांना सहा वर्षांचा प्रेम आणि एक लहान असे दोन मुले आहेत. प्रेम हा दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता, त्या शेडच्या वरुन मुख्य विद्युत प्रवाह असलेली वायर अचानक तुटल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. त्याचवेळी प्रेम त्या ठिकाणी खेळत असताना त्याला विजेचा शॉक लागला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच विद्युत प्रवाह खंडीत करुन प्रेमला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत चिमुकल्याला मयत घोषीत केले.

चिमुकल्याचा मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या आईवडीलांना मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!