तुटलेल्या नाल्यांच्या कठड्यांवर तात्काळ कारवाई!; उपमहापौरांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील लहान-मोठ्या नाल्यांवरील तुटलेले कठडे आणि अनेक ठिकाणी संरक्षक रेलिंग नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. नेरी नाका परिसरातील नाला तसेच शिवाजी उद्यानाजवळील नाल्यावरील कठडे पूर्णपणे तुटले असून शहरातील […]
जळगाव मनपाची मोठी कारवाई! नियमबाह्य जाहिरात फलक हटवत भंगाळे गोल्डवर प्रशासनाचा दणका

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील नियमबाह्य जाहिरात फलकांविरोधात मोठी कारवाई करत डिव्हायडरवर उभारण्यात आलेले भंगाळे गोल्डचे जाहिरात फलक अतिक्रमण विभागामार्फत हटवले. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत उपायुक्तांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. महापालिकेने शहरातील विविध दुभाजक (डिव्हायडर) सुशोभीकरणासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO) आणि उद्योजकांना करारनामा […]
शालार्थ घोटाळा: शेंदुर्णीचे शिक्षण संस्थाचालक तथा भाजप नेते संजय गरुड सोलापुरातून ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी : राज्यात गाजत असलेल्या कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. सोमवारी (दि. २७) उशिरा रात्री जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील शिक्षण संस्थाचालक तसेच भाजप नेते संजय गरुड यांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर घोटाळ्याच्या तपासाला अधिक वेग मिळाला असून, […]