भुसावळ: प्रतिनिधी |भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी भुसावळउलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना राज्य शासनाने अपात्र ठरवले आहे. त्यांच्या जातप्रमाणपत्राबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवार, ४ मे २०२६ रोजी शासनाने अधिकृत आदेश जारी करत भंगाळे यांना नगराध्यक्ष तसेच नगरसेवक या दोन्ही पदांवरून अपात्र घोषित केले. विशेष म्हणजे, शासनाने २३ एप्रिल २०२६ पासूनच त्यांचे नगरसेवक पद निरर्ह (रद्द) ठरवले असून, त्यामुळे त्यांची निवड प्रक्रिया पूर्णपणे अवैध ठरली आहे.

प्रकरण काय आहे?
भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे गायत्री भंगाळे यांनी विजय मिळवला होता.
मात्र, त्यांच्या जातप्रमाणपत्रावर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला. भंगाळे या मूळ महाराष्ट्रातील नसून मध्य प्रदेशातील असल्याचा दावा करण्यात आला होता.
यानंतर प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेले. समितीने सखोल चौकशी केल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्याने त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवले.
या प्रकरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शासनाकडे अहवाल सादर केला होता. त्यावर विचार करून राज्य शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांनी ४ मे रोजी अपात्रतेचा आदेश काढला.
या आदेशानुसार:
नगराध्यक्ष पद रद्द नगरसेवक पद रद्द निवडणूक अवैध घोषित
पुढील राजकीय चित्र
या निर्णयामुळे भुसावळच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
भंगाळे गट न्यायालयात जाण्याची शक्यता
नवीन निवडणुकीची चर्चा सुरू
सत्ताधारी गटाला मोठा धक्का
आता पालिकेची सत्ता कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


